Ramayana : पाकिस्तानात रंगमंचावर रामायण; कराचीच्या शोमध्ये AIचाही वापर; दिग्दर्शक म्हणाले- लोकांचा चांगला प्रतिसाद
पाकिस्तानातील कराची शहरात हिंदू महाकाव्य रामायणाचे सादरीकरण होत आहे आणि प्रेक्षकांकडून त्याला खूप दाद मिळत आहे. ‘मौज’ नावाचा एक नाट्यगट ११ ते १३ जुलै दरम्यान हे नाटक सादर करत आहे, असे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे.