Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टाकडून धक्का; आर्यन खानच्या मालिकेविरुद्धची याचिका फेटाळली
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून धक्का बसला. न्यायालयाने आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजविरोधात दाखल केलेली त्यांची याचिका फेटाळून लावली. या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार आपल्याकडे नाही, असे न्यायालयाने म्हटले.