Tharoor : केरळमधील स्टार्टअप्सच्या विधानावरून थरूर पलटले; म्हणाले- कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात MSME स्टार्टअप्सची गरज
केरळमधील स्टार्टअप्सबाबत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या पूर्वीच्या विधानापासून माघार घेतली आहे. ते म्हणाले की, राज्याला कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात एमएसएमई स्टार्टअप्सची आवश्यकता आहे. दरम्यान, केरळचे उद्योग मंत्री पी. राजीव यांनी ते निराधार असल्याचे म्हटले आहे.