कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र; पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!
कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र, पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची आता अवस्था झालीय.
कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र, पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची आता अवस्था झालीय.
महाराष्ट्रात फडणवीस सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधी मोर्चात एकत्र येण्याची घोषणा ठाकरे बंधूंनी केली. ती त्यांच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी केली.
भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरं तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवण्याची तयारी!! हा असला प्रकार राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आज अचानक सुरू झाला.