बेस्टची निवडणूक “छोटी” आणि “किरकोळ” होती; ही पश्चात बुद्धीची सोयीची मखलाशी!!
बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकी करून देखील ते हरले. त्यानंतर भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी विजय उत्सव साजरा केला तर ठाकरे बंधूंनी ती निवडणूक किरकोळ आणि छोटी असल्याची मखलाशी केली. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी शशांक राव यांना आतून मदत केली होती त्यामुळे शशांक राव यांचे चर्चेत नसलेले पॅनल जिंकून आले, असे विश्लेषण मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.