Thackeray : ठाकरे पितापुत्र भाजपा नेत्यांच्या भेटीला, नेमकं कारण काय?
काही दिवसांपूर्वीच मुंबईतली बेस्ट पतपेढीची निवडणूक पार पडली, अन् बॅलेट पेपरवरील निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंच्या वाट्याला पराभवच आला. या निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे फडणविसांच्या भेटीला गेले होते. आता त्याच पाठोपाठ अमित ठाकरेंनी देखील आशिष शेलारांची भेट घेतली आहे.