Thackeray brothers : कॉंग्रेस आणि पवारांना ठाकरेंची सेना बाय-बाय करणार?
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतांनाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (ता.९), मुंबई येथील एका पत्रकार परिषदेत बोलतांना या शक्यतांना दुजोरा दिला.