Thackeray and Pawar : ठाकरे + पवारांची स्वबळाची कहाणी; ही तर खरी उरल्या सुरल्या जहागिऱ्या वाचवायची स्ट्रॅटेजी!!
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या जबरदस्त फटका खाल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःहून स्वबळाची भाषा सुरू केली, तर शरद पवारांना ती नाईलाजास्तव सुरू करावी लागली. त्यामागे आपापल्या उरल्या सुरल्या जहागिऱ्या वाचवायची खरी स्ट्रॅटेजी असल्याचे उघड दिसले.