• Download App
    Thackeray Alliance | The Focus India

    Thackeray Alliance

    Prakash Mahajan : प्रकाश महाजन अखेर शिंदे गटात, एकनाथ शिंदेंनी स्वागत करत ठाकरे बंधूंच्या युतीवर साधला निशाणा

    मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही निशाणा साधला. सध्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही नवीन लोकं युती करत आहेत. त्यांनी पूर्वीच त्यांचा अनुभव घेतला आहे. पण आता ते पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणताना म्हणालेत.

    Read more

    Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांची टीका- मजबुरी का दुसरा नाम ठाकरे! ठाकरे बंधू पैसा अन् तोड्या करण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा

    अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता व खुर्चीसाठीच एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी आमदारांना कथितपणे मारून टाकण्याची भाषा करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- विजयी मेळावा मराठीपुरताच होता, युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर

    राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे.

    Read more