• Download App
    Thackeray Alliance Nashik | The Focus India

    Thackeray Alliance Nashik

    Nashik Municipal Election : नाशिककरांचे भाजपला दुसऱ्यांदा बहुमत; शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मैत्रीपूर्ण आव्हान परतवले

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची सत्ता राखण्यात भाजप पूर्णत: यशस्वी ठरला. १२२ जागांच्या महापालिकेत तब्बल ७२ जागा जिंकून पक्षाने एकहाती सत्ता मिळवण्यात सलग दुसऱ्यांदा यश प्राप्त केले. त्याच वेळी भाजपला आव्हान देऊ पाहणारे राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीने पूर्ण जागांवर उमेदवार देत दिलेली मैत्रीपूर्ण लढत अपयशी ठरली. विशेषत: उद्धव व राज यांनी ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून एकत्र येत राज्यातील पहिली संयुक्त प्रचारसभा नाशिकमध्ये घेत मैदान मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच्या महाविकास आघाडीला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले.

    Read more