• Download App
    TET paper leak case | The Focus India

    TET paper leak case

    TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती

    महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी आलेल्या राजू प्रयाग शाम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या तिन्ही आरोपींना 27 जून रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून परीक्षेचे प्रश्नपत्रिका संचदेखील जप्त करण्यात आले आहेत.

    Read more

    TET Paper Leak Case : TET पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई; आरोपी दिल्लीहून आले, भिवंडी पोलिसांनी असा रचला सापळा, 1.5 कोटींची होती डील

    राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या पेपरसाठी आरोपींनी तब्बल दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सखोल तपासासाठी पोलिसांच्या विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.

    Read more

    TET पेपर फुटल्याच्या प्रकरणात पोलिसांची आधीच तातडीने कारवाई; नंतर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी!!

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यभरात आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी (TET Exam) पेपर फुटल्याच झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश दिले.

    Read more