Agni-5 : अग्नि-5 ची ओडिशात यशस्वी चाचणी, रेंज 5000km; चीन-पाकपर्यंत मारक क्षमता; भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल
भारताने आपल्या पहिल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-५ ची यशस्वी चाचणी घेतली आहे. बुधवारी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावर त्याची चाचणी घेण्यात आली. अग्नि-५ ची मारा क्षमता ५००० किमी आहे. हे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. म्हणजेच ते एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर डागता येते. त्याची पहिली चाचणी एप्रिल २०१२ मध्ये घेण्यात आली.