Gujarat ATS : गुजरात ATS कडून अल कायदाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; गुजरातेत 2, दिल्ली व नोएडातून प्रत्येकी 1 आरोपी जेरबंद
गुजरात एटीएसने बुधवारी सांगितले की त्यांनी अल-कायदाशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. गुजरातमधून दोन दहशतवादी, एक दिल्ली आणि एक नोएडा येथून पकडले गेले आहेत. हे चौघेही बनावट चलन रॅकेट आणि दहशतवादी संघटनेशी लोकांना जोडण्याचे काम करत होते. ते अशा अॅप्सचा वापर करत होते ज्यामध्ये कंटेंट आपोआप डिलीट होतो.