ISIS : दिल्ली आणि भोपाळमधून ISIS च्या 2 दहशतवाद्यांना अटक, घरात प्लास्टिक बॉम्ब आणि स्फोटके सापडली
दिल्ली आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथून दोन संशयित आयसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीतील एका घरातून स्फोटके, मोलोटोव्ह कॉकटेल, टायमर डिव्हाइस, प्लास्टिक बॉम्ब आणि आयसिसचा ध्वज जप्त केला आहे.