Delhi Blast : दिल्ली स्फोट: 200 शक्तिशाली IED बनवण्याची होती तयारी; एकत्र अनेक स्फोटांनी नरसंहाराचा होता कट
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या गुरुग्राम आणि फरीदाबाद पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी मॉड्यूलचा २०० हून अधिक शक्तिशाली आयईडी तयार करण्याचा हेतू होता. म्हणून, २९०० किलो स्फोटके, टायमर आणि इतर बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणण्यात आले.