Gurugram : गुरुग्राममध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडूची हत्या; अकादमी चालवल्याच्या रागातून वडिलांनी झाडल्या गोळ्या
हरियाणातील गुरुग्राममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केली. टेनिस अकादमीवरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाल्याचे वृत्त आहे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, वडील दीपक यादव यांनी अकादमीसाठी १.२५ कोटी रुपये दिले होते . अवघ्या एका महिन्यानंतर, त्यांनी आपल्या मुलीवर अकादमी बंद करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.