• Download App
    Tellapur Sangareddy Statue Desecration | The Focus India

    Tellapur Sangareddy Statue Desecration

    Chhagan Bhujbal : तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना; भुजबळांचे शाहांना पत्र, कारवाई करण्याची मागणी

    तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महात्मा फुलेंचा अपमान हा देश कदापि सहन करणार नाही,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी इशारा दिला आहे.

    Read more