Chhattisgarh : कुख्यात देवा बारसेचे 20 नक्षलवाद्यांसह आत्मसमर्पण, छत्तीसगडमध्ये दोन चकमकींत 14 नक्षली ठार
छत्तीसगडचा मोस्ट वॉन्टेड नक्षली नेता देवा बारसे याने हैदराबादमध्ये आत्मसमर्पण केले आहे. देवा सोबत 20 नक्षलवाद्यांनीही शस्त्रे खाली ठेवली आहेत. हैदराबादमध्ये दुपारी 3 वाजता पोलीस पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील. सहकाऱ्यांसह देवा तेलंगणातील मुलुगु येथे पोहोचला होता, जिथून पोलिसांनी त्याला हैदराबादला आणले.