Telangana CM : तेलंगणा CMचा ट्रोलर्सना इशारा; नागडे करून रस्त्यावर चोप देईन, सोशलवर कुटुंबाविरुद्ध लिहिणे अयोग्य
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले आहेत की, जे लोक त्यांच्याविरुद्ध अपशब्द वापरतील त्यांना ‘रस्त्यावर नागडे करून फिरवले जाईल आणि मारहाण केली जाईल’. राज्यात दोन महिला पत्रकारांना अटक झाल्यानंतर रेड्डी यांचे हे विधान आले आहे. त्यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे.