• Download App
    Tejpratap Yadav | The Focus India

    Tejpratap Yadav

    Prashant Kishor, : प्रशांत किशोर यांचा आरोप; नितीशनी मते विकत घेतली, संन्यास घेण्याच्या वक्तव्यावर माघार

    बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयामुळे विरोधी पक्षांमध्ये गोंधळ उडाला आहे. आरजेडीच्या पराभवामुळे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी एनडीएवर मत खरेदीचा आरोप केला. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी सांगितले की, जर सरकारने निवडणुकीपूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ६०,००० हून अधिक लाभार्थींना प्रत्येकी १०-१० हजार रुपये वाटले नसते तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या जागा २५ पेक्षा कमी झाल्या असत्या. त्यांनी असे सुचवले की एनडीएने निवडणूक जिंकली नाही, तर मते विकत घेतली.

    Read more