Tejaswi Yadav : बिहारमधील जंगलराजची आठवण, तेजस्वी यादव यांच्याकडून मुस्लिम तृष्टीकरणासाठी गुंडांचे समर्थन
बिहारमधील जंगलराजची आठवण यावी अशा पद्धतीने राष्ट्रीय जनता दलाने गुंडांचे समर्थन सुरू केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात माजी खासदार आणि कुख्यात गुन्हेगार मोहम्मद शहाबुद्दीन याला ‘शहाबुद्दीनजी जिंदाबाद’ अशा घोषणा देत अभिवादन केले. या कार्यक्रमात त्यांनी शहाबुद्दीनच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुलगा ओसामा यांच्याकडून स्वागतही स्वीकारले. शहाबुद्दीन हा राजकारणतील गुन्हेगारीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. कुख्यात डॉन असलेल्या शहाबुद्दीनने फरकाप उडवणाऱ्या पद्धतीने अनेक हत्या केल्या होत्या.