Tejashwi Yadav :बिहारमध्ये २५ नोव्हेंबरला परिवर्तनाची नांदी, तेजस्वी यादवांचा विश्वास
आपण सर्वांनी १४ नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवली पाहिजे. भविष्यात जेव्हा जेव्हा इतिहासाची पाने उलटली जातील तेव्हा ही तारीख बिहारच्या उज्ज्वल भविष्याची, त्याच्या परिवर्तनाची, विकासाची आणि समृद्धीची सुरुवात म्हणून कायमची सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल, असा दावा बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.