Tej Pratap Yadav : लालू पुत्र तेजप्रताप यादव यांनी आता स्वतःला म्हटलं ‘किंगमेकर’
पक्षातून काढून टाकल्यापासून तेजप्रताप यादव सतत सक्रिय आहेत. सोशल मीडियावरील त्यांची विधाने चर्चेत येत आहेत. आता पुन्हा एकदा तेजप्रताप यादव यांनी असं काही म्हटले आहे ज्यामुळे बिहारमधील राजकीय गोंधळ वाढताना दिसत आहे. एका मुलाखतीत तेजप्रताप यादव यांनी दावा केला आहे की ‘’लोक त्यांच्याविरुद्ध कट रचत आहेत, कारण त्यांना माहित आहे की ते पुढचे लालू यादव आहेत.’’