Indigo : मुंबईहून कानपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड; 20 मिनिटे हवेत घिरट्या घालत राहिले, गोंधळ उडाला
शनिवारी दुपारी मुंबईहून कानपूरला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान 6E-824 कानपूर विमानतळावर उतरल्यानंतर तांत्रिक बिघाड झाला. विमान सुरक्षितपणे उतरले, परंतु लँडिंगच्या काही मिनिटांनंतर तांत्रिक बिघाडामुळे गेट उघडू शकले नाही. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट आणि गोंधळ निर्माण झाला. सर्व प्रवासी सुमारे 30 मिनिटे विमानात अडकले होते.