TCS corporate Jihad : माजी खासदार इम्तियाज जलील निदा खान आणि तिच्या कुटुंबाच्या भेटीला; तरीही फरार निदा पोलिसांना सापडेना!!
नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली, त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून ती तिच्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.