Nashik TCS Case : नाशिक TCS प्रकरणातील पीडिता म्हणाली- आरोपीने लग्नाची गोष्ट लपवली, मला रिसॉर्टवर नेऊन बळजबरीने अत्याचार केला
नाशिक येथील टीसीएस कंपनीत घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक माहिती पुढे येत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने आपले लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जबरदस्थीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. पीडितेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपी व आपली ओळख 4 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले आहे. महाविद्यालयात एकत्र शिकत असताना त्यांच्यात मैत्री झाली होती.