NCP Tatkare : हनीट्रॅपबाबत वडेट्टीवारांचे वक्तव्य मूर्खपणाचे; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पलटवार
राज्यात हनीट्रॅपमुळेच शिंदे सरकार सत्तेत आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या या व्यक्तीने केलेले हे वक्तव्य अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी ता. १९ हिंगोलीत पत्रकार परिषदेत दिली.