Tamil Nadu : विरोधी पक्षाच्या खासदारांची संसदेबाहेर निदर्शने; पंजाबात शेतकऱ्यांवर पोलिसांची कारवाई, तामिळनाडूत सीमांकनाला विरोध
गुरुवारी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी, विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने केली. पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली.