Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक
मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे जरांगे यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच मंत्री उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे.