Trump : ट्रम्प म्हणाले – अमेरिकेत टॅलेंटेड लोकांची कमतरता; त्यामुळे स्किल्ड परदेशी लोकांची गरज, H1-B व्हिसावरही नरमले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, देशात अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पुरेसे प्रतिभावान लोक नाहीत, त्यामुळे परदेशी कुशल कामगारांची गरज आहे. ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले. अँकर लॉरा इंग्राहम यांनी ट्रम्प यांना विचारले की एच-१बी व्हिसाची संख्या कमी केली जाईल का कारण त्याचा अमेरिकन कामगारांच्या वेतनावर परिणाम होतो.