Tahawwur Rana : तहव्वुर राणाचा आवाजाचा नमुना घेण्यास न्यायालयाने दिली परवानगी
दिल्लीच्या एका न्यायालयाने एनआयएला २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्या आवाजाचे आणि हस्तलेखनाचे नमुने गोळा करण्याची परवानगी दिली आहे. २८ एप्रिल रोजी विशेष राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) न्यायाधीश चंदरजीत सिंग यांनी राणाच्या कोठडीत १२ दिवसांची वाढ केली, असे एका सूत्राने सांगितले. एजन्सीने दाखल केलेल्या अर्जावर त्यांनी ३० एप्रिल रोजी हा आदेश दिला.