Syria : सीरियात काळजीवाहू सरकार स्थापन, पंतप्रधान नाही; हंगामी अध्यक्ष जुलानी यांनी 23 मंत्र्यांची केली नियुक्ती
माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या बंडानंतर चार महिन्यांनी सीरियामध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. हंगामी अध्यक्ष अल जुलानी यांनी सरकारमध्ये २३ मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. शनिवारी रात्री उशिरा जुलानी यांनी याची घोषणा केली.