Bhiwandi : मुंबईच्या भिवंडीतून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक; 3 लाख रुपये पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून भिवंडीतून तीन तरुणांना अटक केली आहे. या तरुणांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, त्यांनी सुमारे 3 लाख रुपये जमा करून पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.