Sushil Kumar : सागर धनखड हत्याकांडप्रकरणी कुस्तीगीर सुशील कुमारला जामीन मंजूर; मृताच्या आईने म्हटले- त्याला फाशी द्यावी
ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमार तुरुंगातून बाहेर येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने कुस्तीगीराला जामीन मंजूर केला आहे. ज्युनियर कुस्तीगीर सागर धनखड हत्याकांड प्रकरणात तो 4 वर्षे तिहार तुरुंगात होता. उच्च न्यायालयाने सुशील कुमारला ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामिनावर सोडले आहे.