Mohsin Naqvi : पाकिस्तानात गृहमंत्री नक्वींवर राजीनाम्यासाठी दबाव; आशिया कप पराभवानंतर पीसीबी अध्यक्षांविरुद्ध संतापाची लाट
आशिया कपमधील दारुण पराभवानंतर पाकिस्तानमध्ये पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याविरुद्ध निदर्शने तीव्र झाली आहेत. क्रिकेट चाहते तसेच माजी क्रिकेटपटूंनी नक्वी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परिस्थिती अशी होती की रविवारी पाकिस्तानमधील लोकांनी अंतिम सामना संपण्यापूर्वीच त्यांचे टेलिव्हिजन बंद केले. इस्लामाबादचे अस्लम खान म्हणाले भारताकडून दोन सामने गमावल्यानंतर फारशी आशा नव्हती. परंतु अंतिम सामन्यात पाकिस्तानने केलेली फलंदाजी पाहून भारत सामना जिंकेल हे स्पष्ट झाले.