Arunachal : अरुणाचलमध्ये ट्रक दरीत कोसळून 21 ठार; बचावलेला मजूर 2 दिवस पायी चालून आर्मी कॅम्पमध्ये आला, तेव्हा कळली अपघाताची माहिती
अरुणाचल प्रदेशातील अनजॉ जिल्ह्यातील हयुलियांग परिसरात एक ट्रक 1000 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक आणि क्लिनरसह 21 जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाला 18 मृतदेह सापडले आहेत. हा अपघात 8 डिसेंबर रोजी झाला होता. ही माहिती गुरुवारी समोर आली.