काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरचा कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ठपका त्यांच्या वयाच्या 81 व्या वर्षी दूर झाला. कलमाडी भ्रष्टाचाराच्या आरोपातून निष्कलंक बाहेर आले. शरद पवारांच्या एके काळच्या राजकीय शिष्याने भ्रष्टाचाराच्या आरोपातून “निष्कलंक” बाहेर येण्याची किमया साधली, पण त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या राजकीय अथवा अन्य कुठल्या कर्तृत्वाचा किती भाग होता, हा संशोधनाचा विषय ठरावा.