Suresh Kalmadi : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन; बऱ्याच काळापासून आजारी होते; कॉमनवेल्थ गेम्ससारख्या जागतिक स्पर्धा भारतात आणण्यासाठी प्रसिद्ध होते.
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कलमाडी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.