Suresh Dhas: सुरेश धसांचा खुलासा- सतीश भोसले माझा कारभार थोडी चालवतो? तो खोक्या-बिक्या नाही, तर मुकादमांना लेबर पुरवणारा
बीडमधील शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. तेव्हापासून या सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ची चर्चा सुरू आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे खुद्द सुरेश धस यांनी हे मान्य केले होते