• Download App
    Supriya Sule Tweet Sharad Pawar Health | The Focus India

    Supriya Sule Tweet Sharad Pawar Health

    Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर; सततच्या दगदगीमुळे तब्येत खालावल्याची माहिती

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. पण तब्येत फारशी सुधारणा न झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Read more