Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे निर्देश- शाळा-कॉलेज, रुग्णालये, हायवेवरून 8 आठवड्यांत मोकाट कुत्री हटवा, पुढील सुनावणी 13 जानेवारीला
देशातील भटक्या कुत्र्यांच्या धोक्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, बसस्टँड आणि रेल्वेस्थानकांवर कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आठ आठवड्यांच्या आत या ठिकाणांहून कुत्रे कोंडवाड्यात हलवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवरून भटके प्राणी आणि गुरेढोरे हटवण्याचे निर्देशही कोर्टाने एनएचएआयला दिले.