Aravalli Case: अरवली खटली, सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती; तज्ज्ञ समिती तपास करणार
अरवली पर्वतरांगेबाबत निर्माण झालेल्या वादावर आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी आदेश दिला आहे की, तज्ञ समितीच्या शिफारसी आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या पुढील टिप्पण्या सध्या स्थगित (abeyance) राहतील. पुढील सुनावणीपर्यंत या शिफारसी लागू केल्या जाणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी होईल.