Avimukteshwaranand : 3 दिवसांपासून धरणे देत असलेल्या अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस, मेळा प्राधिकरणाने सांगितले- 24 तासांत सिद्ध करा की तुम्ही शंकराचार्य आहात!
प्रयागराजमध्ये रथ थांबवल्याच्या निषेधार्थ धरणे धरून बसलेल्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना माघ मेळा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. मेळा प्राधिकरणाने त्यांना २४ तासांत हे सिद्ध करण्यास सांगितले आहे की तेच खरे शंकराचार्य आहेत.