Supreme Court : बँक खाते फ्रॉड घोषित करण्यापूर्वी सुनावणी आवश्यक नाही; सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- कर्ज घेणाऱ्याला नोटीस-उत्तर देण्याची संधी देणे पुरेसे
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, जर बँकेने कोणतेही खाते फसवणूक (फ्रॉड) म्हणून घोषित केले तर, त्यापूर्वी कर्जदाराला समोरासमोर (वैयक्तिक) सुनावणीची संधी देणे आवश्यक नाही. न्यायालयाने म्हटले की, नोटीस देणे आणि उत्तर देण्याची संधी देणे पुरेसे आहे.