द फोकस एक्सप्लेनर : विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा पुढाकार, देशातील शिक्षण संस्थांना महत्त्वाचे 15 निर्देश
संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेससाठी १५ महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश केंद्र किंवा राज्य सरकारने कायदा करेपर्यंत बंधनकारक राहणार आहेत. या आदेशामागचे कारण विशाखापट्टणममध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे.