Sunil Prabhu : सुनील प्रभूंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र, मुंबई महापालिकेत बदली-बढतीप्रकरणी SIT आणि EOW चौकशीची मागणी
आशियातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मागील काही वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज सुरू आहे. अशा स्थितीत महापालिकेतील बदली आणि बढती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.