Lionel Messi : लिओनेल मेस्सी-देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन; या अंतर्गत 60 खेळाडूंची निवड; मेस्सीला तेंडुलकरची क्रिकेट जर्सी भेट
अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात 3 दिवसांच्या ‘GOAT इंडिया’ दौऱ्यावर आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टायगर श्रॉफ, आर. अश्विन आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री उपस्थित होते.