• Download App
    Sunetra Pawar meets VP CP Radhakrishnan | The Focus India

    Sunetra Pawar meets VP CP Radhakrishnan

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा; विधानसभेवर निवड झाल्याने सोडली खासदारकी

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांना आपले राज्यसभा सदस्यत्व सोडणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार, त्यांनी आज उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, सुनेत्रा पवार आपल्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतील असा अंदाज आहे.

    Read more