• Download App
    Sunetra Pawar Deputy CM | The Focus India

    Sunetra Pawar Deputy CM

    Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले- विमानात काय घडले 9 तारखेनंतर सांगणार; विलीनीकरणाबाबत कुटुंबात कोणतीही चर्चा झालेली नाही

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या अपघाताबाबत नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “विमानात नक्की काय घडलं? कशा प्रकारे ही दुर्घटना झाली? याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून, ९ फेब्रुवारीनंतर मी यावर स्पष्टपणे भाष्य करणार आहे,” असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

    Read more

    Praful Patel : मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही; प्रफुल्ल पटेल म्हणाले- आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही!

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कोण? काय? कसे? कुठे हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट आहे

    Read more

    Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल, छगन भुजबळांचे विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    दोघे ठाकरे जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की अशा काही चर्चा झाल्या नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. माझ्याशी कधीही हे बोलले नाही, कल्पनाही नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावे लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

    Read more

    Fadnavis : अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे:आम्हाला न सांगता विलीनीकरणाची चर्चा करतील का? – देवेंद्र फडणवीस

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. “दोन्ही पक्ष १२ फेब्रुवारीला एकत्र येणार होते,” या शरद पवार आणि जयंत पाटील यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढला आहे. “अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घेतील का?” असा थेट सवाल करत, राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भाजपशी चर्चा करणे आवश्यक असल्याची ‘अट’ मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.

    Read more