Sumona Chakravarti : मराठा आंदोलकांकडून गैरवर्तन, दक्षिण मुंबईत अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा धक्कादायक अनुभव
दक्षिण मुंबईसारख्या सुरक्षित व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भागातसुद्धा महिलांना दिवसाढवळ्या असुरक्षित वाटू शकते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने स्वतःचा भीषण अनुभव इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केला असून, मराठा आंदोलकांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे.